पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदी

एका ज्योतिषी महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर कथित बलात्कार केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता करण ओबेराॅय याला नुकतीच अटक केली आहे. मात्र करणवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत अभिनेत्री पूजा बेदीने त्याची बाजू घेत घेतली.

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदी
SHARES

एका ज्योतिषी महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर कथित बलात्कार केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता करण ओबेराॅय याला नुकतीच अटक केली आहे. मात्र करणवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत अभिनेत्री पूजा बेदीने त्याची बाजू घेत घेतली. एवढंच नाही तर पुरूषांवरील अन्याय दूर करण्यासाठी आता 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज असल्याचंही पूजा म्हणाली. 

बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पूजा बेदीसह, करण ओबेरॉयची बहिण फॅशन डिझायनर गुरबाणी ओबेरॉय, 'बँड ऑफ बॉइज'चे सुधांशु पांडेय, शेरिन वर्गीश, चैतन्य भोसले आणि सिद्धार्थ हल्दीपूर इ. कलाकार सहभागी झाले होते. 

 

खोटं प्रकरण

मी टू चळवळीच्या नावाखाली देशातील असंख्य पुरूषांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. करणवर देखील याच पद्धतीने आरोप करण्यात आले आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. कारण तो एक सज्जन पुरूष आहे. परंतु या प्रकरणामुळे त्याच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 


शिक्का कायम

त्याच्याकडे सगळेच बलात्कारी म्हणून बघत आहेत. प्रसार माध्यमांमध्येही त्याचीच चर्चा आहे.  परंतु, उद्या तो निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्यावर एक छोटी बातमी प्रसिद्ध केली जाईल. पण या प्रकरणात त्याची झालेली बदनामी आणि त्याच्यावर लागलेला शिक्का पुसला जाणार नाही.

 

कायद्याचा गैरवापर

आपल्या देशात महिला त्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा अनेकदा गैरवापर करताना दिसतात. अशा महिलांना ओळखलं पाहिजे. तसंच खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलेल्या पुरूषांना न्याय मिळावा यासाठी मेन टू चळवळ सुरू झाली पाहिजे, असंही बेदी म्हणाली.  



हेही वाचा-

झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा

अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा