अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत

एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉय याला अटक करण्यात आली आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा या महिला ज्योतिषाचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत
SHARES

एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉय याला अटक करण्यात आली आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा या महिला ज्योतिषाचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी करणला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


चौकशी सुरू

करणने बलात्काराचा व्हिडिओ बनवून आपल्याकडून पैसे उकळल्याचा आरोप पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी ओबेरॉयला रविवारी तब्यात घेऊन त्याच्यावर भादंवि चं कलम ३७६ (बलात्कार) आणि ३८४ (पैसे उकळणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. करण सिंह ओबेरॉयने अनेक टीव्ही मालिका केल्या असून ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली होती.


काय आहे तक्रारीत?

ओशिवरा पोलिस स्थानकातील तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्याने पीडितेला भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं. तिथं त्याने पीडितेला नारळ पाणी दिलं, हे पाणी पिऊन तिला चक्कर आली. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ बनवला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

यानंतर ओबेराॅयने व्हिडिओ सार्वजनिक करण्याच्या नावाखाली पीडितेला ब्लॅकमेल करून पैसे उकळायला सुरूवात केली. लग्नाबाबत विचारल्यास आरोपी टाळाटाळ करारचा. काही दिवसांपूर्वी लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने धमकी दिली. तेव्हा पोलिसांत तक्रार केल्याचं पीडितेने तक्रारीत सांगितलं आहे.हेही वाचा-

पालघर स्थानकातील रेल्वे पोलिसांची ड्युटी ८ तास

रेल्वेमध्ये खिसे कापूंचा सुळसुळाट, ३ महिन्यात ५ हजार ९०८ तक्रारीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय