झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा

कुठलीही नोकरी वा उद्योगधंदा नाही, उत्पन्नाचा कुठलाही अधिकृत स्त्रोत नसताना वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या बँक खात्यात ४९.२० कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. झाकीर नाईकविरोधात तयार करण्यात आलेल्या या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने बुधवारी न्यायालयात हा दावा केला.

झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा
SHARES

कुठलीही नोकरी वा उद्योगधंदा नाही, उत्पन्नाचा कुठलाही अधिकृत स्त्रोत नसताना वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या बँक खात्यात ४९.२० कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. झाकीर नाईकविरोधात तयार करण्यात आलेल्या या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने बुधवारी न्यायालयात हा दावा केला. या दाव्याची दखल विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतली आहे.


असंख्य गुन्ह्यांची नोंद

दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे तसंच प्रक्षोभक भाषणं करून तरूणांची माथी भडकवणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला झाकीर नाईक सध्या फरार आहे. नाईकविरोधात २०१६ मध्ये बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (uapa) अंतर्गत गुन्हा नोंदवत ‘ईडी’ त्याची सर्व खाती गोठवली आहे. तसंच त्याची सर्व मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


पैशांची गुंतवणूक

‘ईडी’ने  त्याच्याविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं आहे. त्यावर बाजू मांडताना ‘ईडी’ने न्यायालयाला सांगितलं की, नाईकच्या खात्यातून १९३.०६ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. ही रक्कम मुंबई-पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात गुंतवण्यात आली आहे. यातही काही रक्कम झाकीर नाईक याच्याशी संबंधित हार्मोनी मीडियातही गुंतवण्यात आली आहे. चेन्नईतील बांधकाम सुरू असलेली शाळा तसंच म्युच्युअल फंडातही या पैशातून गुंतवणूक करण्यात आल्याचा युक्तिवाद ‘ईडी’ने न्यायालयात केला.हेही वाचा-

झाकीर नाईक विरोधात 'ईडी'कडून दोषारोपपत्र दाखल

दाऊदचा हस्तक शकील'लंबू'चा हृदयविकाराने मृत्यू


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय