दाऊदचा हस्तक शकील'लंबू'चा हृदयविकाराने मृत्यू

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक म्हणून शकील लंबू सर्वांना परिचीत होता. मुंबईत राहून शकील त्याचा सर्व कारभार पहायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याला हृदयाचा त्रास होत असल्याने त्याच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.

दाऊदचा हस्तक शकील'लंबू'चा हृदयविकाराने मृत्यू
SHARES

मुंबईतल्या १९९३ बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा हस्तक शकील अहमद शेख उर्फ (लंबू)चा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराने मृत्यू झाला. जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

जसलोकमध्ये उपचार

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक म्हणून शकील लंबू सर्वांना परिचीत होता. मुंबईत राहून शकील त्याचा सर्व कारभार पहायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याला हृदयाचा त्रास होत असल्याने त्याच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी सकाळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी अतिदक्षता (आयसीयू) विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

खास हस्तक

दाऊदच्या टोळीत छोटा शकील व्यतिरिक्त शकील नावाचे अन्य दोन हस्तक होते. त्यात शकील अहमद शेख हा उंचीने सर्वात मोठा असल्यामुळे त्याला लंबू हे टोपण नाव ठेवण्यात आलं होतं. १९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटात आरोपी म्हणून शकील लंबूचंही नाव होतं.

गंभीर गुन्ह्याची नोंद

स्फोटक आणण्यासाठी पैसा पुरवणं, त्या स्फोटकांना सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात लंबूचा हात होता. त्या व्यतिरिक्त त्याच्यावर डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या विविध पोलिस ठाण्यात आहे.

हेही वाचा -

झाकीर नाईकच्या फायनान्सरला मुंबईतून अटक

५ वर्षानंतर लागला हत्येचा छडा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा