झाकीर नाईकच्या फायनान्सरला मुंबईतून अटक

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक याच्या फायनांन्सरला सक्तवसुली संचालनालयाने (इडी) मुंबईतून अटक केली आहे.

झाकीर नाईकच्या फायनान्सरला मुंबईतून अटक
SHARES

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक याच्या फायनांन्सरला सक्तवसुली संचालनालयाने (इडी) मुंबईतून अटक केली आहे. अब्दुल कादीर नजमुद्दीन साथक असं त्याचं नाव असून झाकीर याला संदिग्‍ध पद्धतीने आर्थिक मदत करण्याच्या आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. साथक याने पुरवलेल्या पैशांनी झाकीर व्हिडिओ आणि अन्य वस्तू बनवून स्वत:च्या कामाचा प्रचार करत होता. दरम्यान, या प्रकरणी इडीने मुंबई आणि पुण्यातून तब्बल १६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


संशयास्पद व्यवहार

अब्दुल कादीर नजमुद्दीन साथक हा मे. ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या नाईक याच्या पीस टीव्ही चॅनेलची मालकी असलेल्या कंपनीचा संचालक आहे. झाकीर याला पीएमएलए म्हणजे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली. त्याने नाईक याला मदत केली असून संयुक्त अरब अमिरातीतील अज्ञात व संशयास्पद खात्यातून पैसे नावे करण्यात साथक याचा हात होता. या प्रकरणी त्याला मुंबई पीएमएलए न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.


दहशतवादी कारवाई

भारतीय सुरक्षा संस्थांनी त्याच्यावर सतत लक्ष ठेवलं असून ढाका येथील १ जुलै २०१६ मधील हल्ल्यात सामील दहशतवाद्यांना नाईक याने प्रोत्साहित केलं होतं. या हल्ल्यामध्ये २२ जण ठार झाले होते. नाईक हा भारताला दहशतवादी कारवाया व द्वेषमूलक भाषणांच्या प्रकरणात हवा असून तो २०१६ मध्ये देश सोडून गेला होता. सध्या झाकीर हा मलेशियामध्ये राहत आहे.



हेही वाचा -

जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा