झाकीर नाईक विरोधात 'ईडी'कडून दोषारोपपत्र दाखल

आधारावर ईडीने झाकीरच्या संस्थेला आणि त्याला मदत म्हणून येणाऱ्या पैशांची सखोल चौकशी केली होती. त्यावेळी बेहिशोबी मालमत्ता त्याच्याजवळ आढळून आली होती. त्या आधारावर २२ डिसेंबर २०१६ मध्ये "ईडी'ने नाईकविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा नोंदवला होता. नाईक आणि त्याच्या साथीदारांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.

झाकीर नाईक विरोधात 'ईडी'कडून दोषारोपपत्र दाखल
SHARES

धार्मिक भावना भडकावणे, तसंच मनी लाँन्ड्रींग आदी आरोप असलेले मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक विरोधात ‘ईडी’ (सक्तवसुली संचलनालया)ने विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार विविध गुन्ह्याशी संबंधीत त्याच्या १९३ कोटींच्या मालमत्तेची ओळख पटवण्यात आली असून सुमारे ५० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ईडीने या पूर्वीच टाच आणण्यात आली आहे. 


ईडीकडून मालमत्तेवर टाच

 राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)ने वादग्रस्त धर्म प्रचारक झाकीर नाईकसह संबधितांवर २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने झाकीरच्या संस्थेला आणि त्याला मदत म्हणून येणाऱ्या पैशांची सखोल चौकशी केली होती. त्यावेळी बेहिशोबी मालमत्ता त्याच्याजवळ आढळून आली होती. त्या आधारावर २२ डिसेंबर २०१६ मध्ये "ईडी'ने नाईकविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा नोंदवला होता. नाईक आणि त्याच्या साथीदारांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. त्याच्या मुंबई आणि पुण्यातील अशा सहा मालमत्ता त्यावेळी ईडीने टाच आणली होती. 


दोषारोपपत्र सादर

 तपासानुसार, नाईकने केलेली बहुतांश वादग्रस्त विधाने २००७ ते २०११ या कालावधीत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’  या त्याच्या संस्थेने आयोजित केलेल्या १० दिवसीय शांती परिषदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातून अनेक तरुण दहतवादी कारवाया करण्यासाठी प्रेरित झाल्याचेही आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. हे याप्रकरणातील दुसरे आरोपपत्र आहे. मात्र, नाईक विरोधात ईडीने केलेल्या तपासातील पहिले आरोपपत्र आहे.


या मालमत्तेवर टाच

१) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या नावावरील ९ कोटी ४१ लाख किमतीची म्युच्युअल फंड

 २) हारर्मोनी इंडियाच्या नावावरील माझगाव डॉकयार्ड येथील स्टुडिओ 

३) इस्लामिक एड्युकेशन ट्रस्टची शाळेची इमारत 

४) झाकीर नाईकच्या मालकीचा माझगाव येथील दोन फ्लॅट 

५) माझगाव मारिया हाईट्‌समधील फ्लॅट 

६) माझगाव येथील क्रीस्टल रेसिडेन्सीमधील फ्लॅट




हेही वाचा

सट्टा बाजाराची मुंबईत युतीला पसंती, ५ जागा मिळण्याचा दावा

कार्ड क्लोनिंगचे गुन्हे ५ वर्षात वाढले ५ पटीने





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा