मेहुल चोक्सीची १५१ कोटींची संपत्ती जप्त

गीतांजली जेम्स या कंपनीकडे बँकांची १२, ५५८ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यातच आता ईडीने मेहुल चोक्सीभोवती फास आवळण्यात सुरूवात करत त्याची १५२ कोटीची मालमत्तेवर जप्ती आणली आहे.

मेहुल चोक्सीची १५१ कोटींची संपत्ती जप्त
SHARES

पीएनबी घोटाल्यातील सह आरोपी मेहुल चोक्सीवर ईडीने कारवाईचा बडगा उगारत त्याची १५१ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्या आलिशान गाड्या आणि अलिबागच्या बंगल्यावर कारवाई केली होती.                  

             

नीरवची मालमत्ता जप्त

लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११ हजार ३६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी  सध्या ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने केलेल्या तक्रारीनंतरच लंडनमध्ये बिनदिकत्त फिरणाऱ्या नीरव मोदीला तुरुंगात टाकण्यात आलं. डीने आतापर्यंत नीरवची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. या जप्त मालमत्तेत नीरवच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर उभ्या असलेल्या ८६ कोटी रुपयांच्या ८ अलिशान कारचा समावेश आहे. तसंच ईडीने ५६०० कोटींचे मौल्यवान दागिने हस्तगत करत नीरवच्या २९ प्राॅपर्टीजना सील ठोकलं आहे.  


चोक्सीला दणका

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील गीतांजली जेम्स ही कंपनी विक्रीला काढत बँकांनी काही दिवसांपूर्वी चोक्सीला दणका दिला होता. गीतांजली जेम्स या कंपनीकडे बँकांची १२, ५५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ईडीने चोक्सीभोवती फास आवळण्यात सुरूवात करत त्याच्या १५२ कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे.



हेही वाचा-

झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा