‘लोढा द पार्क’मध्ये चोरी

कंत्राटदार त्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. याचाच फायदा घेत, मोहम्मदने त्याच इमारतीत पूर्वी काम करणार्या एकाची मदत घेऊन, तेच साहित्य पून्हा चोरून भावाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवायचा.

‘लोढा द पार्क’मध्ये चोरी
SHARES

लोअर परळ येथील ‘लोढा द पार्क’ ही बाधकाम सुरू असलेली इमारत सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. टोलेजंग इमारतीचे बांधकाम आणि सुशोभीकरण करणाचे काम अंतिम टप्यात असताना. या इमारतीतील कंत्राट दारांचे साहित्य चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अनिस मोहम्मद रशीद सय्यद (२८), मनसुर अली रमजानअली सय्यद (३२) अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही चोर त्या इमारतीतील इलेक्ट्रिक कामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीना साहित्य पुरवायचे.


 कामासाठी दिले कंत्राट

लोअरपरळ येथे लोढा द पार्क ही मुंबईतील सर्वात उच्चभ्रू आणि उंच इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत इलेक्ट्रीशनच्या कामाचे कंत्राट लोढाने ए.एन.एस इलेक्ट्रीशन कंपनीला दिले आहे. कामाची व्याप्ती मोठी असल्यामुळे याच इमारतीच्या सहाव्या माळ्यावर ए.एन.एस कंपनीला साहित्य जमा करण्यासाठी गोऊडन देण्यात आले. ए.एन.ए. कंपनीने इमारतीचे इलेक्ट्रीशनचे काम करणाऱ्यासाठी लागणारे साहित्य मोहम्मद अनिस मोहम्मद रशीद सय्यद याच्या मोठ्या भावाच्या दुकानातून मागवले जायचे. याच माळ्यावर इतर ही कंत्राटदारांची गोडाऊन आहे.


कंत्राटदाराचे दुर्लक्ष 

 दरम्यान सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंतच काम चालायचे. मागील कित्येक महिन्यांपासून गोडाऊनमध्ये साहित्य पोहचवण्यासाठी मोहम्मद जात असल्याने त्याने गोडाऊनमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याचे हेरले होते. तसेच पोहचवण्यात आलेल्या साहित्यांची नोंद व्यावसायिक कंपनीकडे व्हायची. त्यामुळे कंत्राटदार त्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. याचाच फायदा घेत, मोहम्मदने त्याच इमारतीत पूर्वी काम करणार्या एकाची मदत घेऊन, तेच साहित्य पून्हा चोरून भावाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवायचा. सामान चोरीला जात असल्याचा संशय आल्यानंतर कंत्राटदाराने गोडाऊनमध्ये कुणाच्या ही न कळत सीसीटिव्ही कॅमेरे १ मार्च रोजी लावले.

 दुकान मालकानेच रचला चोरीचा डाव

त्यावेळी ए.एन.एस इलेक्ट्रीशन कंपनीमध्ये साईड मॅनेजर भरत निकम यांनी ते सीसीटिव्ही पडताळले असता. त्यात मोहम्मद हा तोडांला रुमाल बांधून गोडाऊनमधून वेळोवेळी साहित्य चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भरतने एन.एम.जोशी मार्ग पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद अनिस मोहम्मद रशीद सय्यद (२८), मनसुर अली रमजानअली सय्यद (३२) या दोघांना अटक केली. या सर्व चोरीमागे मोहम्मदच्या मोठ्या भावाचाही हात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या तिघांनी मागच्या काही महिन्यात कोट्यावधी रुपयांच्या सामानाची चोरी करून तेच सामान पून्हा कंत्राट दाराला विकल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी एन.एम.जोशी मार्गचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

कॅनाॅन कंपनीची बनावट उपकरणे विकणाऱ्यावर कारवाई



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा