मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी

राज्याचे मुख्य सचिव यु. पी. एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सेवा ज्येष्ठतेनुसार मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे.

SHARE

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली आहे. परदेशी सध्या मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव आहेत. 


म्हैसकरही चर्चेत होत्या

राज्याचे मुख्य सचिव यु. पी. एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सेवा ज्येष्ठतेनुसार मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे. मदान आॅक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते.  मदान सेवा पूर्व करून निवृत्त झाले असते, तर कदाचित मेहता यांना ही संधी मिळाली नसती, कारण ते स्वत: सप्टेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत. पालिका आयुक्तपदासाठी प्रवीण परदेशी तसंच नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची नावं चर्चेत होती. हेही वाचा -

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
संबंधित विषय
ताज्या बातम्या