टोमॅटो दरामध्ये मोठी वाढ; प्रतीकिलो ५० रुपये

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दररोजच्या जेवणात आणि विशेष म्हणजे चाट सारख्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांमध्ये वापर होणाऱ्या टोमॅटोच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. काही ठिकाणी हे दर प्रतिकिलो ७० रुपयांपर्यंत गेले आहेत. कमी प्रमाणात होत असलेले उत्पादन आणि पावसामुळं टोमॅटो पिकाचं झालेले नुकसान यामुळं बाजारातील आवक घटल्यानं ही दरवाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मागील आठवड्यापर्यंत २० ते २५ रुपये किलो दरानं मिळणाऱ्या टोमॅटोचे दर एका आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्यस्थितीत ५० रुपयांच्या आसपास टोमॅटोचे दर आहेत. नाशिक जिल्ह्यासारख्या टमाट्याचं मोठं उत्पादन होणाऱ्या ठिकाणीही दर ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचले आहेत. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळं या पिकाचं नुकसान झाल्यानं बाजारामध्ये होणारी आवक घटली असल्यामुळं ही दरवाढ होत असल्याचं समजतं. 

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये किलोपर्यंत असलेले दर आता ४० रुपयांवर पोहोचले आहेत. नगरमध्ये दर ५० रुपये आहेत. मुंबईत ४० ते ५० रुपये, रत्नागिरी येथे सध्या ८० रुपये किलोचा दर आहे, तर कोल्हापूरमध्ये दर २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असे आहेत.सांगलीत ३० ते ४० रुपये, सोलापूर ५० ते ७० रुपये, तर नागपूरमध्ये ६० ते ७० रुपये असे दर आहेत.


हेही वाचा -

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!


पुढील बातमी
इतर बातम्या