Advertisement

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल
SHARES

बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमिताभ यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ट्वीट केलं की, "माझ्या कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुटुंब आणि कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणूचीही चाचणी घेण्यात आली असून त्यांचा अहवाल लवकरच येईल. गेल्या १० दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची तपासणी करावी."

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. सुरुवातीला लक्षणं दिसताच त्यांनी आपली कोरोनाची टेस्ट केली. त्यांच्या अधिक चाचण्या घेत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं म्हटलं आहे. 

अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील सर्व लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. तसंच त्यांच्या घरातील कर्मचार्‍यांचीही चाचणी घेण्यात आली आहे. प्रत्येकानं स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. कुटुंबातील सदस्य आणि कर्मचार्‍यांच्या चाचणीचा अहवाल अजून बाकी आहे. 

आजकाल अमिताभ बच्चन त्यांचा प्रसिद्ध गेम शो 'कौन बनेगा करोडपती' या १२व्या सिजनची तयारी करत आहेत. तथापि, कोरोना विषाणूमुळे, महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर जाण्याची किंवा कोणत्याही प्रकारची कामं करण्याची परवानगी नाही. हेच कारण आहे की या मार्गदर्शक तत्त्वांमुळे बिग बीसुद्धा त्यांच्या शोचे शूट करू शकले नाहीत.

अमिताभ बच्चन यांचा नुकताच 'गुलाबो सीताबो प्रदर्शित झाला होता. चित्रपटात आयुष्मान खुराना त्यांच्यासोबत काम करत होता. यापूर्वी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. पण नंतर कोरोना साथीमुळे हा अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती शुजित सरकार यांनी केली होती.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा