एकत्र रजेवर जाण्याचा महापालिकेच्या इंजिनिअर्सचा निर्णय रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेचे निवृत्त चीफ इंजिनिअर शितला प्रसाद कोरी यांना अटक केली. याआधी पोलिसांनी मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते, नीरजकुमार देसाई, महापालिकेचा कार्यकारी अभियंता अनिल पाटील या तीन जणांना अटक केली होती. पोलीस एका मागोमाग एक इंजिनिअर्सना अटक करत असल्यानं या कारवाईचा विरोध म्हणून महापालिकेच्या ४२ इंजिनिअर्सनी एकत्र रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मंगळवारी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतल्यानंतर या इंजिनिअर्सनी रजेवर जाण्याचा निर्णय रद्द केला.

इंजिनिअर्सना अटक

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलीस एका मागोमाग एक पालिकेच्या इंजिनिअर्सना अटक करत असल्यामुळं त्याचा विरोध करण्यासाठी महापालिका इंजिनिअरींग यूनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअरतर्फे एकत्र रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मागण्या मान्य

या प्रकरणी, 'आम्ही एकूण ५० इंजिनिअर्सनी ३ मुख्य मागण्या घेऊन महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ५० इंजिनिअर्सना इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (आयआयटी) मध्ये १५ दिवसांसाठी प्रशिक्षणाकरीता पाठवणार असल्याचं म्हटलं. तसंच, रिक्त पदे लवकरात लवकर भरावी. त्याचप्रमाणं भविष्यात अशा काही घटना घडल्या तर विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत कारवाई करू नये. आमच्या या मागण्या आयुक्तांनी मान्य केल्यामुळं आम्ही रजेवर जाण्याचा निर्णय रद्द केला आहे', असं बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स यूनियनचे अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितलं.


हेही वाचा -

पश्चिम आणि मध्य रेल्वे रेल्वे रुळांवर पाणी न तुंबण्यासाठी वाढणार रुळांची उंची

मुंबई- पुणे महामार्गावर ७ दिवस १५-१५ मिनिटांचा विशेष ब्लॉक


पुढील बातमी
इतर बातम्या