Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ७ दिवस राहणार बंद

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून पुण्याच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुढील ७ दिवस १५-१५ मिनिटांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ७ दिवस राहणार बंद
SHARES

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून पुण्याच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुढील ७ दिवस १५-१५ मिनिटांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील दरडींचं काम करण्यासाठी तसंच, ढिले झालेले दगड काढण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ला जोडणाऱ्या मार्गिकेवर काम करण्यात येणार आहे.

वाहतूक बंद

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होते. यामुळं प्रवाशांना तासंतास एकाच ठिकाणी अडकून राहावं लागतं. त्यामुळं तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडी आणि ढिले दगड असलेली ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


१५-१५ मिनिटांचा ब्लॉक

या कामासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे या कालावधीत १५-१५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन सुट्ट्यांच्या काळात हे काम करण्यात येत असल्यामुळं या मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


'असा' असेल ब्लॉक

  • ब्लॉक १ - १०.०० ते १०.१५
  • ब्लॉक २ - १०.४५ ते ११.००
  • ब्लॉक ३ - ११.४५ ते १२.००
  • ब्लॉक ३ - १२.४५ ते ०१.००
  • ब्लॉक ४ - ०२.०० ते ०२.१५
  • ब्लॉक ५ - ०३.०० ते ३.१५
  • ब्लॉक ६ - ०४.०० ते ०४. १५



हेही वाचा -

पश्चिम आणि मध्य रेल्वे रुळांवर पाणी न तुंबण्यासाठी वाढणार रुळांची उंची



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा