Advertisement

पश्चिम, मध्य रेल्वे मार्गावरील रुळांची उंची वाढवणार

रेल्वे प्रशासन दरवर्षी रेल्वे मार्गाच्या सफाईसाठी लाखो रुपये खर्च करते. तरीही रेल्वे मार्गावर पाणी साचून सेवा विस्कळीत होतेच. यावर उपाय म्हणून आता रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम, मध्य रेल्वे मार्गावरील रुळांची उंची वाढवणार
SHARES

पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईसह उपनगरातील रस्त्यांसह रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं. पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन दरवर्षी रेल्वे मार्गाच्या सफाईसाठी लाखो रुपये खर्च करते. तरीही रेल्वे मार्गावर पाणी साचून सेवा विस्कळीत होतेच. यावर उपाय म्हणून आता रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याआधी कल्व्हर्ट, रुळांदरम्यानची गटारे, स्थानकांदरम्यानची नालेसफाई करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत रेल्वे हद्दीतील ६० टक्के नालेसफाईची कामं पूर्ण झाली आहेत. १ जूनपर्यंत पावसाळी तयारीची पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण केली जाणार आहेत. तसंच, दुसऱ्या टप्प्यातील कामं ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहेत.

रुळांची उंची वाढवणं

मागील वर्षी पावसाळ्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई-विरार स्थानकांमधील रेल्वे रुळांवर पाणी तुंबलं होतं. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. ही पूर परिस्थिती टाळण्यासाठी रुळांची उंची २०० मिलीमीटरपर्यंत वाढवण्यात येणार असून, हे काम २५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान सखल भागात रेल्वेरूळ असल्याने तिथं देखील पाणी भरतं. त्यामुळं या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांची उंची ६ इंचाने वाढवण्याचं काम १ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

नाल्यांची सफाई

चर्चगेट ते विरार मार्गावर एकूण ५३ नाले असून, यापैकी ३७ नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित १६ नाल्यांची सफाई २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामं जून आणि दुसऱ्या टप्प्यातील कामं ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण ३३ कल्व्हर्ट असून २३ कल्व्हर्टची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. सीएसएमटी ते मानखुर्द मार्गावर २८ कल्व्हर्ट असून २६ कल्व्हर्ट सफाईकामे पूर्ण करण्यात आली आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील विविध ड्रेनेज मार्गावरील एकूण १५ हजार ८४७ मीटरची साफसफाई करण्यात आली आहे.

या ठिकाणी पंप

मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, विरार या ठिकाणी एकूण १५४ पंप कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसंच, सीएसएमटी ते कल्याण मार्गावर ४०, सीएसएमटी ते मानखुर्द मार्गावर २६, कल्याण-कर्जत मार्गावर १०, पंप कार्यान्वित करण्यात येणार आहेत.हेही वाचा -

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांना कात्री, मुंबईतील काॅलेज १२ दिवस आधीच होणार सुरूRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा