नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील नवीन इमारतींमध्ये आता रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था असणं बंधनकारक असणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग नसल्यास त्या इमारतींना पाणी जोडणी देण्यात येणार नाही, असं पत्र मुंबई महानगरपालिकेने म्हाडा आणि एसआरएला दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत बांधल्या जाणाऱ्या सर्व इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल. 

 मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली.  म्हाडा आणि एसआरएने बऱ्याच इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगशिवाय इमारतींना परवानगी दिल्याचं यावेळी निदर्शनास आलं. महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या परवानगीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही समावेश आहे. मात्र, म्हाडा आणि एसआरएने या नियमला बगल दिल्याचं आयुक्तांना दिसून आलं. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग नसल्यास महापालिकेकडून पाणी जोडणी दिली जाणार नसल्याचे पत्र पाठवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी त्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार प्रत्येक विभागीय आयुक्तांनी म्हाडा आणि एसआरएच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटला पत्र पाठविले आहे. यापुढे बिल्डिंग प्रपोजल पालिकेकडे सादर करतानाच या इमारतीच्या नकाशात रेन हार्वेस्टिंगची सोय केली आहे की नाही ही बाब तपासली जाणार आहे. अन्यथा त्यांना पाणीजोडणी दिली जाणार नसल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

मोठ्या सोसायट्यांना बायोगॅस प्रकल्प बंधनकारक

अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम


पुढील बातमी
इतर बातम्या