अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

मुंबईतील असल्फा भागात २ मार्च २००७ रोजी कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. अरुण गवळीने या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं.

अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम
SHARES

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. 

 मुंबईतील असल्फा भागात २ मार्च २००७ रोजी कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. अरुण गवळीने या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पोलिसांनी अरुण गवळीला २००८ मध्ये अटक केली होती. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने  अरुण गवळीसोबत १० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसंच १४ लाखांचा दंडही ठोठावला होता. गवळीसोबत इतरांनीही जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. 

काय आहे  प्रकरण?
कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. या वादातून सदाशिव सुर्वे याने अरुण गवळीच्या टोळीमधील दोघांनाा जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांनी सुर्वेची गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी मागितली होती. गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसे याला जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले होते. यानंतर शूटरच्या मदतीने २ मार्च २००७ रोजी कलमाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळीबार करत हत्या करण्यात आली.



हेही वाचा  -

चेेंबूरमध्ये बहिणीने केली भावाची हत्या

त्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा