त्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या

रोज दारू पिऊन राजू घरी येत असे. दारूच्या नशेत तो दोघींना मारहाण आणि शिवीगाळ करत होता. रोजच्या त्रासाला दोघीही कंटाळल्या होत्या.

SHARE

त्रासाला कंटाळून दोन बायकांनी नवऱ्याची हत्या केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली आहे. राजू वाघमारे (वय 32) असं मृताचं नाव आहे. तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.  सविता आणि सरीता अशा त्याला दोन बायका होत्या.

राजू दोन बायकांसह गोरेगावच्या शहीद भगतसिंग झोपडपट्टीत राहत होता. दोन्ही बायकांपासून त्याला चार मुलं होती. रोज दारू पिऊन राजू घरी येत असे. दारूच्या नशेत तो दोघींना मारहाण आणि शिवीगाळ करत होता. रोजच्या त्रासाला दोघीही कंटाळल्या होत्या. अखेर त्यांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं आणि तो झोपेत असतानाच त्याची हत्या केली.

 राजूला पगार कमी असल्यामुळे चार मुलांसह त्यांची ओढाताण होत होती. दोघीही घरकामं करून हातभार लावत होत्या. मात्र, राजू रोज दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा. दोघींनी राजूला अनेक वेळा समजावलं होतं. मात्र, तरीही तो  ऐकत नव्हता. अखेर दोघींनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. राजू झोपलेला असताना त्यांनी उशीने त्याचा गळा दाबून हत्या केली. राजूच्या भावाला ही घटना समजल्यानंतर त्याला संशय आला. त्याने पोलिसांना कळवलं. चौकशीत दोघींनी राजूच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. हेही वाचा  -

नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले
संबंधित विषय
ताज्या बातम्या