नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले

मुलीच्या शरीरावर नाळ तशीच असल्याने ही मुलगी नुकतीच जन्मलेली असावी असा अंदाज केला जात आहे.

SHARE

नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना कांदिवली येथे उघडकीस आली आहे. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. 

कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात जय भारत कॉम्प्लेक्स ही २१ मजली इमारत आहे. गुरुवारी दुपारी इमारतीच्या खाली मुलगी मृतावस्थेत सापडली. त्यानंतर रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना कळविले. कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. मुलीच्या शरीरावर नाळ तशीच असल्याने ही मुलगी नुकतीच जन्मलेली असावी असा अंदाज केला जात आहे. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी नको म्हणून हे कृत्य करण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने इमारतीमधील रहिवाशांची चौकशी केली.

 एका महिलेवर पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.  वैद्यकीय उपचार देणे गरजेचे असल्याने तिला अद्याप अटक केली नसल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितलं. तिने हे कृत्य का केले? हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. हेही वाचा -

धावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकलले

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या