Advertisement

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई

दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई केली जाणार आहे.

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई
SHARES

एकावेळी ३ शालेय विद्यार्थ्यांना दुचाकीवरू नेंलं जातं. मात्र, आता दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई केली जाणार आहे. याबाबच कारवाईचे आदेश परिवहन आयुक्त यांनी सर्व आरटीओंना दिले आहेत. तसंच दुचाकीस्वार आणि सहप्रवासी किंवा विद्यार्थ्यांनं हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

रिक्षांविरोधात कारवाई

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांची कंत्राटी पद्धतीनं वाहतुक करणाऱ्या रिक्षांविरोधात कारवाई करावी, असं मुंबई उच्च न्यायालयानं निरिक्षण नोंदविलं आहे.


विशेष मोहीम हाती

२५ नोव्हेंबरपासून परिवहन विभागाकडून अनधिकृत स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम १० डिसेंबपर्यंत सुरू असून, न्यायालयानं नुकत्याच नोंदविलेल्या निरिक्षणानुसार मोहीमेत रिक्षा व दुचाकींवरील कारवाईचाही समावेश केला आहे. याबाबत ४ डिसेंबर २०१९ रोजी परिवहन विभागानं आदेश काढले आहेत.


दुचाकीस्वारांची तपासणी

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्यास, अथवा दुचाकीचालक तसंच, सहप्रवासी किंवा विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान केलं नसेल तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.हेही वाचा -

महापरिनिर्वाण दिन: लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?Read this story in हिंदी
संबंधित विषय