Advertisement

महापरिनिर्वाण दिन: लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

यंदाही शुक्रवारी संकाळपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायींनी चैत्यभूमीकडं येण्यास सुरुवात केली आहे.

महापरिनिर्वाण दिन: लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल
SHARES
दरवर्षी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून अनेक आंबेडकर अनुयायी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर गर्दी करतात. त्याचप्रमाणं यंदाही शुक्रवारी संकाळपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायींनी चैत्यभूमीकडं येण्यास सुरुवात केली आहे. या अनुयायींची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका, पोलिस आणि वाहतूक प्रशासनाच्या नियोजनपूर्ण बंदोबस्तात गुरुवारी संध्याकाळपासूनच करण्यात आला आहे.

लाखोंचा जनसमुदाय

झेंडे, फिती, बिल्ले, स्टिकर्स कौतुकानं छातीवर परिधान करत 'जय भीम'चा नारा देत लाखोंचा जनसमुदाय बाळासाहेबांनी भारतीय राजकारण, संविधानासाठी दिलेल्या योगदानाचं स्मरण करत आहेत. तसंच, शिवाजी पार्क परिसरात राज्यातील विविध भागांतून प्रकाशक, लेखक यांनी आपल्या पुस्तकांचं स्टॉल लावले आहेत. यामध्ये कला, साहित्य, विपशयना, धम्म या विषयांसह पुरोगामी विचार, चळवळ तसेच स्पर्धा परीक्षा, महापुरुषांची चरित्रे इ. पुस्तकं उपलब्ध करण्यात आली आहेत.

कँडल मार्च

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे, मुंबईतील हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह ते चैत्यभूमीपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला.



हेही वाचा -

'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?

एमएमआरडीएमार्फत पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटींचा निधी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा