धावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकलले

गुरूवारी सकाळी विजयने ९ च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. लोकलला प्रचंड गर्दी असल्याने आतमध्ये शिरणंही मुश्कील होतं. मात्र, कसाबसा विजयने आत प्रवेश केला.

SHARE

लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे रोज अनेक प्रवाशांचे एकमेकांसोबत वाद होत असतात. यातून कधीकधी टोकाचे वाद होऊन हाणामारीही होते. गुरूवारी सकाळी अशाच एका वादात एका प्रवाशाला चक्क धावत्या लोकलधून फेकण्यात आलं. यामध्ये विजय राम गुप्ता (३५) हा प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 विजय हा मानखुर्द येथे राहतो. गुरूवारी सकाळी त्याने ९ च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. लोकलला प्रचंड गर्दी असल्याने आतमध्ये शिरणंही मुश्कील होतं. मात्र, कसाबसा विजयने आत प्रवेश केला.  कुर्ला स्थानक येण्याआधी विजय आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर तीव्र भांडणात झालं. यामुळे संतापलेल्या प्रवाशाने विजयला जोरात धक्का देऊन लोकलमधून फेकले. यामध्ये विजय गंभीर जखमी झाला.

 वादाचं नेमकं कारण समोर आलं नाही. मात्र, गर्दीत धक्का लागल्यामुळे भांडण झाल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली.हेही वाचा -

लाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं


संबंधित विषय
ताज्या बातम्या