Advertisement

लाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं

लाचखोरीत अव्वल असलेल्या महसूल विभागाला आता पोलिसांनी मागे टाकलं आहे. पोलिसांची लाचखोरीची प्रकरणे सर्वात जास्त उघडकीस आली आहेत.

लाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं
SHARES

लाचखोरीत अव्वल असलेल्या महसूल विभागाला आता पोलिसांनी मागे टाकलं आहे. पोलिसांची लाचखोरीची प्रकरणे सर्वात जास्त उघडकीस आली आहेत. लाच घेण्याच्या १७६ प्रकरणांत २४७ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर महसूल विभागातील २३९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीनुसार यावर्षी नोव्हेंबर अखेरीपर्यंत लाचखोरीत सरकारी खात्यात पोलिस विभागाचा पहिला तर महसूल विभागाचा दुसरा क्रमांक राहिला आहे. २०१९ मध्ये २०१८ च्या तुलनेत एसीबीच्या सापळ्यांमध्ये घट झाली आहे. या वर्षात मुंबई क्षेत्रात भ्रष्टाचाराची सर्वात कमी जर पुणे क्षेत्रात सर्वात जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली. मुंबई क्षेत्रात ३७ तर पुणे क्षेत्रात १६५ भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सरकारी खात्यांमध्ये सध्या पोलिस आघाडीवर असून सापळे आणि आरोपींबरोबरच या खात्यातील लाचखोरीची रक्कमही जास्त आहे. 

 नोव्हेंबरपर्यंत पोलिस खात्यामध्ये ५२ लाख ८५ हजार ५० रुपये इतक्या रकमेचा तर महसूल खात्यात ३३ लाख ७७ हजार ७०० रुपये इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे.  भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये लाचखोरांना त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारीपाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे. १९५ लाचखोरांचे संबंधित विभागाने निलंबन केलेले नाही. निलंबित न केलेल्यांमध्ये ग्रामविकास खाते पहिल्या क्रमांकांवर असून सर्वाधिक ३७ लाचखोर निलंबित करूनही कार्यरत आहेत. ग्रामविकासनंतर शिक्षण व क्रीडा (३४), महसूल विभाग (२६), पोलिस (१४) आणि आरोग्य विभाग (१०) या  विभागांचा नंबर लागतो.

लाचलुचपतीची प्रकरणे

विभाग        २०१८    २०१९

मुंबई                ४५      ३७

नांदेड               ९४      ७५

ठाणे                 ११२    ९६

औरंगाबाद          १२२   ११७

पुणे                   २०४    १६५

नाशिक               १२३    ११४

नागपूर                १३६    १००

अमरावती            १००    १०४



हेही वाचा -

अनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट

मुंबई आणि परिसरात पावसाची गुरूवारी पहाटे हजेरी





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा