Advertisement

अनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट

मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट रुग्णालय प्रशासनाकडून घातला जात आहे.

अनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट
SHARES

मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट रुग्णालय प्रशासनाकडून घातला जात आहे. या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीसह लहान मुलांवरील विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. मात्र, मागील ३ महिने वाडिया रुग्णालयाला महापालिकेनं तब्बल ९८ कोटी रुपयांचं अनुदान न दिल्यानं रुग्णालयाच्या सेवा-सुविधांवर ताण येत असल्याचा आरोप बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी केला.

वाडिया व पालिकेतील वादामुळं रुग्णालयाला अनुदान मिळलं नव्हतं. मात्र, हे थकित अनुदान देऊन 'वाडिया' जगवावं अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेकडं केली आहे. लहान मुलांवरील उपचारासाठी वाडिया रुग्णालयाची ओळख आहे. रुग्णालयाची ४० टक्के जागा महापालिकेची असून, रुग्णालय चालवण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिलं जातं. परंतु, जागा व निधी महापालिकेकडून दिला जात असतानाही रुग्णालय खासगी पद्धतीनंच चालवलं जातं.

निधी देऊनही रुग्णांना उत्तम प्रकारे सेवा मिळत मिळत नाहीत. त्यामुळं हे रुग्णालय महापालिकेला चालवण्यासाठी द्यावं, असं महापालिकेचं म्हणणं आहे. पालिका व वाडिया यांच्या वादात महापालिकेकडून देण्यात येणारे अनुदान मागील ३ महिन्यांपासून देण्यात आलेलं नाही. निधीअभावी रुग्णालयाच्या सुविधांवर ताण येत असल्यानं यापुढे रुग्णांना दाखल करून घेतलं जाणार नाही. तसंच, जे रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्याची भूमिका रुग्णालय प्रशासनानं घेतली आहे.

विरोधी पक्ष रवी राजा यांनी बुधवारी स्थायी समितीत याबाबतचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. महापालिका-वाडिया रुग्णालयाच्या वादात लहान मुलांसाठी असलेलं हे एकमेव हे रुग्णालय निधीअभावी बंद करण्याचा घाट घातला जात असेल तर ते धक्कादायक आहे, असा आरोप राजा यांनी केला. रुग्णालयाच्या ट्रस्टवर ४ नगसेवक आहेत. मात्र, सेवा खासगी स्वरूपात दिल्या जातात. त्यामुळं महापालिकेलाच हे रुग्णालय चालवण्यास का दिले जात नाही, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी विचारला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा