Advertisement

मुंबई आणि परिसरात पावसाची गुरूवारी पहाटे हजेरी


मुंबई आणि परिसरात पावसाची गुरूवारी पहाटे हजेरी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिक बदलत्या वातरणामुळं प्रचंड हैराण झाले आहेत. कधी उन्हाळ्यात अचानक पडणारा पाऊस, थंडीच्या महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळं मुंबईकरांची त्रासात भर पडते आहे. दरम्यान, येत्या ३ दिवसांत राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. परंतु, गुरूवारी पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसानं हजेरी लावली.

ढगाळ वातावरण

मुंबई आणि कोकण आणि गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक शहरांमधील किमान तापमान ६ अंशाखाली उतरले असून, आता महाराष्ट्रातही थंडीचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

थंड वारे

पंजाब, हरयाणाबरोबरच उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. पुढील ३ दिवसांत राज्यातही गारठा वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. विदर्भात थंडीचं आगमन होणार असून, त्यानंतर मराठवाडा आणि इतर ठिकाणी थंडी वाढल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

थंडीच्या दिवसात पडणाऱ्या या पावसामुळं सोशल मीडियावर अनेकांनी विनोदी ट्विट करण्यास सुरूवात केली आहे.



हेही वाचा -

मुंबईवर गुरुवारी पावसाचं सावट?

दादर स्थानकातील आरपीएफ जवानाला मारहाण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा