SHARE

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण केल्याची घटना दादर स्थानकात घडली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी आरोपींना दादर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नरेश कांबळे, यशवंत कांबळे आणि धनराज कांबळे अशी जवानाला मारहाण करणाऱ्यांची नाव आहे. हा कर्मचारी वाद सोडवण्यासाठी गेला असताना त्यांला मारहाण करण्यात आली आहे. या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जवानाला मारहाण

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६-७ वरील बॅग स्कॅनरजवळील शौचालयाजवळ तिघांमध्ये ७च्या सुमारास वाद सुरू होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी दिलीप कुमार यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटवत असतानाच दिलीप कुमार यांना तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

शौचालयाजवळ गर्दी

यामुळे शौचालयाजवळ गर्दी जमा झाली. गर्दीकडे पाहून तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त जमावानं तिघांनाही चांगलाच चोप दिला. अखेर दादर आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत जमावाच्या ताब्यातून तिघांची सुटका करत दादर रेल्वे पोलीसांच्या स्वाधीन केलं.हेही वाचा -

१० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार

MHT-CETचं संभाव्य वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या