चेेंबूरमध्ये बहिणीने केली भावाची हत्या

चेंबूरच्या चिखलवाडी परिसरात ३ डिसेंबरला झुडपांमध्ये हातपाय बांधलेला मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

SHARE

बहिणीने भावाची हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. देवेंद्र आखाडे (३२) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याची बहीण रेश्मा ओव्हाळ आणि दुसऱ्या बहिणीचा पती सुमीत पाटणकर यांना अटक केली आहे. 

देवेंद्र दारू पिऊन घरच्यांना रोज मारहाण करतो म्हणून त्याची हत्या केल्याचं या दोघांनीही पोलिस चौकशीत सांगितलं आहे. चेंबूरच्या चिखलवाडी परिसरात ३ डिसेंबरला झुडपांमध्ये हातपाय बांधलेला मृतदेह सापडला होता. आर.सी.एफ पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट ९ चे अंकुश वानखेडे यांना मृतदेह मिळण्याआधी दोन दिवस या परिसरात एक महिला व पुरुष दोघे फिरत असल्याची माहिती मिळाली. 

या माहितीवरून पोलिसांनी शोध घेत रेश्माला शोधून काढले. सुरूवातील रेश्माने काहीही सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसींना आपला खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. रेश्माने सुमीतच्या मदतीने देवेंद्रला मारल्याची कबुली दिली आहे. हेही वाचा  -

त्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या

रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडिंग मशीन बंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या