SHARE

लोकल प्रवासवेळी प्रवाशांची पाण्याची तहान भागविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन (WVM) उपलब्ध करण्यात आली होती. या मशीनच्या माध्यमातून प्रवाशांना २ रुपयांत ३०० मिली शुद्ध आरओ पाणी मिळत होतं. परंतु, आता हे शुद्ध आरओ पाणी केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहे. ठेकेदारांना ही सेवा महागडी वाटू लागली आहे. त्यामुळं आयआरसीटीसीनं शुक्रवारी पत्र लिहून पश्चिम रेल्वेवरील २३ स्थानकांवरील डब्ल्यूव्हीएम सेवा बंद झाल्याची माहिती दिली.

शुद्ध पाण्याची सेवा

वॉटर व्हेंडिंग मशीन बंद झालेल्या स्थानकांमध्ये मुंबईतील काही उपनगरीय स्थानकांचाही समावेश आहेत. आयआरसीटीसीनुसार, हाय टेक स्वीट वॉटर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडनं रेल्वेद्वारे दिली जाणारी पाणी आणि विजेची बिलं अदा केलेली नाहीत. या कंपनीनं प्रवाशांद्वारे तक्रार केल्यानंतर आयआरसीटीसीकडून केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही भरलेली नाही. या कंपनीद्वारे मुंबई विभागात ३९ ठिकाणी शुद्ध पाण्याची सेवा देण्यात येत होती.

कंपनीद्वारे असमर्थता

आयआरसीटीसीनं कंपनीद्वारे असमर्थता दाखविण्यात आल्यानंतर रेल्वेला कळविलं आहे. या कंपनीद्वारे जोपर्यंत बिल भरले जात नाही तोपर्यंत कोणतीही पाणी शुद्धीकरण मशीन किंवा त्याचा सुटा भागही न्यायला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. याचाच अर्थ जोपर्यंत या बिलाची रक्कम भरली जात नाही तोपर्यंत नवीन सेवा पुन्हा सुरू होणं अशक्य आहे.हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 'इतक्या' टक्क्यांची कपात

वायूप्रदूषण टाळण्यासाठी बेस्ट बसचा प्रवास करावा- किशोरी पेडणेकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या