म्हणून बेस्ट बसचा प्रवास करा- किशोरी पेडणेकर

वायूप्रदूषण टाळण्याकरिता सार्वजनिक वाहतूक उपक्रम असलेला बेस्ट बसचा प्रवास नागरिकांनी करावा, यासाठी प्राधान्यानं लक्ष घालणार असल्याचं मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

SHARE

मुंबईतील वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळं वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. या वायूप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशातच, वायूप्रदूषण टाळण्याकरिता सार्वजनिक वाहतूक उपक्रम असलेला बेस्ट बसचा प्रवास नागरिकांनी करावा, यासाठी प्राधान्यानं लक्ष घालणार असल्याचं मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

महापौरपदी नियुक्ती

किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी महापालिकेनं जप्त केलेल्या प्लास्टीकचा वापर करून प्लास्टीक प्रणालीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. प्लास्टीकमुक्त अभियानामध्ये नागरिकांचा अधिकाअधिक सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शून्य कचरा मोहीम प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार आहे. कांदळवन संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.

प्रशासकीय प्रयत्न

मुंबईतील प्रदूषणही वाढत असून, ते कमी करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न व्हावेत, यासाठी मुंबईकर वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र, आता महापौरांनी दिलेली आश्वासनांनुसार मुंबईतील वायूप्रदूषण कमी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

विलंब शुल्कासह आयकर रिटर्न सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

मुंबई सेट्रल स्थानकात प्रवाशांसाठी पॉड हॉटेलसंबंधित विषय
ताज्या बातम्या