Advertisement

आयटी रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

करदात्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विलंब शुल्कासह आयकर रिटर्न सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत आहे.

आयटी रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत
SHARES

करदात्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विलंब शुल्कासह आयकर रिटर्न सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतर ITR रिटर्न सादर केल्यास करदात्यांना दुप्पट दंड म्हणजेच १० हजारांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. आयकर विभागानं वैयक्तिक करदात्यांना ३१ जुलै पर्यंत रिटर्न फायलिंगची मुदत दिली होती. मात्र करदात्यांना कंपन्यांकडून फॉर्म १६ मिळण्यात झालेला उशीर, तांत्रिक अडचणींमुळं रिटर्न फायलिंगला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.

रिटर्न फायलिंग

३१ ऑगस्टपर्यंत वैयक्तिक करदात्यांना रिटर्न फायलिंगसाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, या अंतिम मुदतीदरम्यान अनेकांना कर भरलेला नाही. त्यामुळं मुदतीनंतर आता रिटर्न फायलींग करणाऱ्यांना ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर अधिनियम १९६१ च्या 'कलम २३४ एफ' नुसार ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्याला ५ हजारांचा दंड आणि त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना १० हजारांचा दंड लावला जाणार आहे.

विलंब शुल्क

ज्या करदात्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, अशा करदात्यांना विलंब शुल्क म्हणून एक हजारांचा दंड भरावा लागणार आहे. त्याशिवाय ज्या करदात्यांचं वार्षिक उत्पन्न कर वजावटीचा लाभ घेतल्यानंतर करमुक्त असेल तर त्यांना रिटर्न फायलिंग करता दंड भरावा लागणार नाही.



हेही वाचा -

मुंबई सेट्रल स्थानकात प्रवाशांसाठी पॉड हॉटेल

आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केलंय, पुढील महापौर भाजपचा- चंद्रकांत पाटील



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा