एल्फिन्स्टन पुलाच्या दुरुस्तीसाठी सचिनची २ कोटींची मदत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकरने एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात सचिन तेंडुलकरने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्याने खासदार निधीतून मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी प्रत्येकी १-१ कोटी मंजूर केले असून मुंबई जिल्हधिकारी यांना या निधीतून पुलाचं बांधकाम करण्याची विनंती केली आहे.

ही जबाबदारी प्रत्येकाची

तेंडुलकरने या पत्रात म्हटलं आहे की, 'एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर घडलेल्या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला, ही घटना धक्कादायक होती. त्यामुळेच आपण मुंबईकरांची मदत करू इच्छितो. त्या दुर्घटनाग्रस्तांच्या घरी दिवाळी साजरी झालीच नसेल. भारतात अशी घटना घडू नये याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाने घेतली पाहिजे.

चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी

मुंबईमध्ये २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांनी आपले प्राण गमावले होते. परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी प्रवासी याच पुलाचा वापर करतात.  


हेही वाचा - 

पुन्हा तोच गोंधळ, तिच तऱ्हा, एल्फिन्स्टन स्टेशनमध्ये स्लॅब पडून महिला जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या