Advertisement

पुन्हा तोच गोंधळ, तिच तऱ्हा, एल्फिन्स्टन स्टेशनमध्ये स्लॅब पडून महिला जखमी


पुन्हा तोच गोंधळ, तिच तऱ्हा, एल्फिन्स्टन स्टेशनमध्ये स्लॅब पडून महिला जखमी
SHARES

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेला १५ दिवस उलटत नाही, तोच पुन्हा एकदा याच रेल्वे स्टेशनवर आणखी एक दुर्घटना घडलीय. शुक्रवारी एल्फिन्स्टन स्थानकातील तिकीट खिडकीजवळ उभ्या असलेल्या महिलेच्या डोक्यावर स्लॅबचा तुकडा कोसळला. दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. अनिता बसाक (३८) असं या महिलेचे नाव असून या तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आलं.


पुन्हा अफवा, पुन्हा गोंधळ

या दुर्घटनेत महिला प्रवाशाला गंभीर इजा झाली नसली, तरी तिला तातडीनं केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुदैवी बाब म्हणजे या घटनेनंतर स्लॅब कोसळला अशी अफवा स्थानकात पसरून काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

चेंबूर येथे राहणाऱ्या अनिता शुक्रवारी दुपारी कामानिमित्त एल्फिन्स्टन येथे आल्या होत्या. स्थानकातील मधल्या पुलाकडील तिकीट आरक्षण खिडकीजवळ त्या उभ्या होत्या. त्याचवेळेस छताकडील काळ्या रंगाचा ग्रॅनाइट अचानक कोसळून त्यांच्या डोक्यावर आदळला. ही दुर्घटना घडताच तिथे ड्युटीवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी त्यांना १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सने केईएम रुग्णालयात पाठवले. उपचारादरम्यान, अनिता यांच्या डोक्यावर दोन टाके पडले असून त्यांना इतर कोणतीही जखम न झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा