Advertisement

एल्फिन्स्टन पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी, 22 ठार, 39 जखमी


एल्फिन्स्टन पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी, 22 ठार, 39 जखमी
SHARES

Refresh Feeds

  • मुंबईमध्ये वर्षाला 3 ते 4 हजार प्रवासी रेल्वे अपघातात मृत्यू मुखी पडतात. हा अाकडा देशभरात 15 हजारापर्यंत आहे. हे कुठेतरी थांबवले पाहिजे. 2012 मध्ये डॉ. अनिल काकोडकर समितीने मुंबईची लोकल सेवा सुधारण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या उपययोजना सुचवल्या होत्या. मात्र पाच वर्ष झाले तरी यात सुधारणा प्रत्यक्षात झालेली नाही, अशी खंत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. 



  • संध्याकाळी 4.32 - 22 मृतांपैकी 17 जणांची ओळख पटली असून मुंबई पोलिसांकडून रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. याचसोबत पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना  5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.


  • दुपारी 3.55 - 
  • दुपारी 3.54 - 
  • दुपारी 3.43 - 
  • दुपारी 3.29 - डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व फूटओव्हर ब्रिजचे ऑडिट करणार - पियुष गोयल
  • दुपारी 3.18 - 


  • दुपारी 3.10 - मृत व्यक्तींच्या नावांची यादी


  • दुपारी 3.09 - केईएम रुग्णालयात विविध तज्ज्ञ आणि 40 डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला 200 पॅरामेडिकल स्टाफ देण्यात आला आहे. केईएममध्ये सीटीस्कॅन, एमआरआयची तातडीची सेवा करून दिली आहे -उपायुक्त सुधीर नाईक

 

  • दुपारी 3.03 - घटनास्थळी त्वरीत चार डॉक्टर, पाच वैद्यकीय अधिकारी आणि 10 पॅरामेडिकलचे एक पथक पाठवले होते - उपायुक्त सुधीर नाईक


  • दुपारी 3.02 - 


  • दुपारी 3.00 - अभिनेता रितेश देशमुख यानेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्याने या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करत दु:ख व्यक्त केला आहे. 


  • दुपारी 2.54 - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा मुंबईतील आजचा कार्यक्रम रद्द
  • दुपारी 2.34 -  जखमींच्या उपचारांवरील संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार - मुख्यमंत्री


  • दुपारी 2.29 - मुंबईकरांनी रक्तदान केल्याबद्दल मुंबई पोलिसांनीही त्यांचा आभार व्यक्त केला आहे. 
  • दुपारी 2.24 - मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क करा 


  • दुपारी  2.19 - जखमींच्या उपचारांवरील संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार - मुख्यमंत्री


  • दुपारी  2.14 - 

  • दुपारी 2.09 -

  • दुपारी 2.04 - केईएम परिसरात मीडियाविरोधात घोषणाबाजी आणि धक्काबुक्की


  • दुपारी 1.40 - मुंबईचे गृहसचिव सुधीर श्रीवास्तव आणि मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी केली घटनास्थळाची पाहणी
  • दुपारी 1.38 - दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल - पियुष गोयल 


  • दुपारी  1.24 - जखमींची नावे


  • दुपारी 1.23 - 


  • दुपारी 1.12 - 


  • दुपारी 1.10 - 
  • मुंबईतील घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


  • दुपारी 1.08 - 


  • दुपारी 1.06 - सर्व जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात केले दाखल
  • दुपारी 1.05 - सर्व मृतदेह केईएम रुग्णालयात नेण्यात आले
  • दुपारी 1.02 - 33 जखमी, 24 पुरुष, 9 महिलांचा समावेश
  • दुपारी 1 वाजता - 22 जणांचा मृत्यू, 13 परुष, 8 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश  
  • दुपारी 12.55 - पश्चिम रेल्वे वाहतूक 10-15 मिनिटे उशिरा
  • दुपारी 12.54 - 


  • दुपारी 12.51 - 

ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतून सर्वाधिक उलाढाल होत असताना देखील मुंबईकरांच्या सोईकडे केंद्र सरकार गांभिर्याने लक्ष देत नाही. मी अनेकदा पत्रव्यवहार करून देखील आम्हाला केंद्राकडून प्रतिसाद मिळत नाही. हे सरकार आणि रेल्वेचे आधिकारी ढिम्म आहेत. या घटनेला सर्वश्री रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. बुलेट ट्रेनचा घाट घातला गेलाय, मात्र मुंबईच्या लोकलकडे दुर्लक्ष केलं जातंय.

अरविंद सावंत, खासदार शिवसेना

  • दुपारी 12.49 - रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही, रेल्वे सुरळीत सुरू
  • दुपारी 12.43 - 22 जणांचा मृत्यू, 36 जखमी 
  • दुपारी 12.42 - बीएमसीचा हेल्पलाईन नं - 24136051, 24107020, 24131419
  • दुपारी 12.39 -


  • दुपारी 12.37 - महापौर विश्वनाथ महाडेश्वर घटनास्थळी दाखल
  • दुपारी 12.35 

    Here's the footage from #Elphinstone road stampede which happened today.@mumbaitraffic @iamamumbaikar @RidlrMUM pic.twitter.com/p39N7y8Syh— Mumbai Live (@MumbaiLiveNews) September 29, 2017
  • दुपारी 12.33 - केईएम रुग्णालयात रक्तदात्यांची गरज
  • दुपारी 12.32 - मृतांमध्ये 18 पुरुष, 4 महिलांचा समावेश
  • दुपारी 12.31 - केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल मुंबईत दाखल
  • दुपारी 12.28 - प्रवासी आणि परिसरातील नागरिकांना घटनास्थळावर जाण्यास मनाई
  • दुपारी 12.27 - रेल्वेमंत्री पियुष गोयल करतील घटनास्थळाची पाहणी
  • दुपारी 12.26 - 22 जणांचा मृत्यू


  • दुपारी 12.20 -



  • दुपारी - 12.15 

मुंबईत सकाळच्या वेळी प्रवाशांची भयानक गर्दी असते. अशावेळी रेल्वेने प्रवाशांना उत्तम सेवा पुरवावी, लोकलची सेवा सुधारावी. इथे बुलेटट्रेनपेक्षा लोकलची स्थिती सुधारावी. आज लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या उद्घाटनासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल मुंबईत येत आहेत. त्याच वेळी ही घटना घडली. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यापेक्षा रेल्वेचे ट्रॅक वाढवा. 4 ट्रॅकचे सहा ट्रॅक करा.

- सुभाष तळेकर, प्रवक्ता, मुंबई डबेवला


मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन-परळला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 39 जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन सकाळी नोकरदार वर्गाची गर्दी झालेली असतानाच ही घटना घडली.

  • सकाळी 10.30

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किट आणि पूल तुटणार अशी अफवा पसरल्याने प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे मिळेल त्या वाट्याने जाण्यासाठी प्रवासी धडपड करू लागले आणि यामुळेच ही चेंगराचंगरी झाली. ज्यामुळे जवळपास 39 जण जखमी झाले. तर यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह केईएम रुग्णालयात नेण्यात आले आहे.

  • सकाळी 10.35



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा