दहिसरमध्ये पार पडलं SERO सर्वेक्षण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावीतील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पालिकेनं सुटकेचा श्वास सोडला असेल. पण दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये पालिकेचे विशेष लक्ष आहे. दहिसरच्या गणपत पाटील नगर मध्येही महापालिका सातत्यानं लक्ष ठेवून आहे. दहिसरच्या आनंद गार्डन, क्रिस्टल पॅलेस आणि गणपत पाटीलनगर गल्ली इथं १ ते ४ जुलैला एसईआरओ (SERO) सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणात १०० हून अधिक जणांनी भाग घेतला. नागरिकांनी फॉर्म भरल्यानंतर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले. या भागांमध्ये अधिक धोका असलेल्या सर्व संशयित रुग्णांना तात्काळ वेगळं ठेवण्यात येत आहे.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसर उपनगरामध्ये जूनमध्ये कोरोना बळींची वाढती संख्या पाहायला मिळाली. म्हणूनच, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित भागात लॉकडाऊन राबवण्याची भूमिका पालिका आणि पोलिसांनी बजावली आहे. एखादा रुग्ण आढळला तर सोसायटीच्या समितीनं इमारतीत कडेकोट लॉकडाऊन केला पाहिजे. त्या परिस्थितीत पूर्ण जबाबदारी ही सोसायटीची असेल. आरोग्य तपासणी, ताप तपासणी शिबिर इत्यादी विविध उपक्रमांतून रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.


हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या