Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

गूड न्युज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै २०२० रोजी १.६८ टक्के होता. हा दर काल (दिनांक १२ जुलै २०२०) १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

गूड न्युज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ
SHARES

कोविड १९ संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून  मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून त्यांना यश येत आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ५० दिवसांवर आला आहे. या सोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

हेही वाचाः- मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस

कोविड १९ संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक उपाययोजना करताना पालिकेकडून योग्य नियोजन, अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर दिला जात आहे. महानगरपालिका प्रशासनाने २२ जून २०२० रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३७ दिवस होता. हा कालावधी २ ते ३ आठवड्यांत ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १ जुलै २०२० रोजी ४२ दिवसांवर पोहोचला. तर आज (दिनांक १३ जुलै २०२०) हा कालावधी ५१ दिवसांचा आहे.  मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै २०२० रोजी १.६८ टक्के होता. हा दर काल (दिनांक १२ जुलै २०२०) १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

हेही वाचाः- University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठा

एका बाजूला रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे, त्यांना वेळीच शोधणे यावर जोर दिला जात असताना दुसऱया बाजूला प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. २२ जून २०२० रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे ५० टक्के होते. दिनांक १ जुलै २०२० रोजी हे प्रमाण ५७ टक्के झाले. तर दिनांक १२ जुलै २०२० रोजी हा दर ७० टक्के झाला आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱया रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोविड १९ बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्या (बेड) रिकाम्या असण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत विविध समर्पित कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून २२ हजार ७५६ रुग्णशय्या उपलब्ध आहेत. यापैकी १० हजार १३० बेड रिकामे आहेत. साहजिकच रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची तक्रार आता निकालात निघाल्या सारखीच  आहे. महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) च्या माध्यमातून रुग्णशय्यांचे व्यवस्थापन होऊ लागल्याने त्यामध्ये सुसूत्रता आली.

           

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा