बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबई महापालिकेत बेस्ट समितीचा कारभार पुन्हा एकदा शिवसेनेच्या हाती आला आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांचा विजय झाला.

बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे, भाजपकडून प्रकाश गंगाधरे व काँग्रेसकडून रवी राजा यांनी अर्ज भरले होते. मात्र, रवी राजा यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिली. त्यामुळं शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांचा सहज विजय झाला. शिंदे यांना आठ मते तर भाजपचे प्रकाश गंगाधरे यांना ५ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली.

सोमवारी स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीतूनही काँग्रेसनं ऐनवेळी माघार घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारीही झाली. त्यामुळे शिवसेनेला शह देण्याची तयारी करणाऱ्या भाजपला तिन्ही समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. 

काँग्रेसच्या या माघारीच्या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेसमोर लोटांगण घातले, अशी टीका भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.


हेही वाचा -

मुंबई महापालिकेच्या स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी

रिक्षांच्या वयोमर्यादेत बदल, १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या