राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली आहे.
राज्य परिवहन प्राधिकारणाने हा निर्णय जाहीर केला आहे. नव्या निर्णयानुसार, १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई एमएमआर परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे.
माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर राज्य परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. २०१७ मध्ये खटुआ समितीनं महाराष्ट्र सरकारला यासंदर्भातील आपला अहवाल सोपवला होता. त्यापैकी रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत.
मुंबईत जुन्या रिक्षांंचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रदुषण आणि अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. या संदर्भात अनेक तज्ज्ञ समित्यांनी आपले अहवाल दिले होते. या सर्व गोष्टींमुळे वाहतुकीला शिस्तही लागत नव्हती. त्यामुळे रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ
यंदा एसटीची हंगामी दरवाढ नाही?