Advertisement

यंदा एसटीची हंगामी दरवाढ नाही?

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

यंदा एसटीची हंगामी दरवाढ नाही?
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी होणारी हंगामी दरवाढ यंदा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिकीटदर वाढवल्यास प्रवाशांचा रोष ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं एसटी महामंडळाकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. अनेकांनी पगार कपातीचे संकट ओढावले. आता अनलॉकमध्ये हळूहळू सर्व क्षेत्रे सुरू होत आहेत. कामानिमित्त नोकरदार वर्गांचा प्रवास सुरू झाला असून एसटी वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या दीड ते दोन महिन्यांआधी एसटीच्या दिवाळी नियोजनाची सुरूवात होत असून, दिवाळी नियोजनाची होणारी बैठक अद्याप झालेली नाही. राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होऊन ही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्याशिवाय कोरोनामुळे आलेली आर्थिक मंदीमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला.

हंगामी दरवाढीमुळे १०० ते १५० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते. सध्या एसटीच्या राज्यात ७ हजार गाड्या सुरू असून यातून सुमारे ७ लाख प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशात प्रवासी वाहतुकीची मुख्य जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. यामुळे भाववाढ केल्यास सरसकट सर्वच एसटीतील प्रवाशांना तिकीट दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा