Advertisement

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ

जून ते सप्टेंबपर्यंत रेल्वे रूळ ओलांडताना लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या धडके त एकूण १५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. या वाढत्या संख्येमुळं मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर पुन्हा एकदा अपघातसत्र सुरू झाले आहे. जून ते सप्टेंबपर्यंत रेल्वे रूळ ओलांडताना लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या धडके त एकूण १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रूळ ओलांडताना १३५ आणि लोकलमधून पडून १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु, १५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. या प्रवासी संख्येत जसजशी वाढ झाली, त्याप्रमाणे लोकल फेऱ्यांमध्येही वाढ झाली. सध्याच्या घडीला मध्य रेल्वे मार्गावरून ४३१ लोकल फेऱ्या होत असून सव्वा ते दीड लाख प्रवासी प्रवास करतात, तर पश्चिम रेल्वेवर ५०६ लोकल फेऱ्यांमधून ३ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांत अपघाताचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या २ महिन्यांत अपघातांचे प्रमाण नगण्य होते. मात्र जून महिन्यापासून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर वाहतूक वाढली आणि अपघातसत्र सुरू झाले.

जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंत रूळ ओलांडताना लोकल व मेल-एक्स्प्रेसच्या धडके त ४६५ जण, तर १४७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये जून ते सप्टेंबर २०२० पर्यंत एकूण १३५ जणांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. तर लोकलमधून पडून १६ जणांचा मृत्यू आणि १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात ४२ जणांचा रूळ ओलांडताना आणि सहा जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात अपघात सर्वाधिक आहेत. लोकलमधून पडून झालेल्या अपघातांत १६ पैकी १४ पुरुष, तर दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे. तर १४ जखमींमध्ये१३ पुरुष प्रवासी आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा