दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा कायापालट, उभारणार हॉकर्स प्लाझा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दक्षिण मुंबईतील लोकप्रिय फॅशन डेस्टिनेशन अशी फॅशन स्ट्रीटची ओळख आहे. शॉपिंगसाठी तरुणांचे तर हे फेवरेट ठिकाण आहे. कपडे, शूज आणि फॅशन अॅक्सेसरीजसाठी तर इथे प्रचंड गर्दी असते. सर्वांचे आवडते आणि प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटचा लवकरच कायापालट करण्याचाा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)ने घेतला आहे.

पालिका शॉपिंग स्ट्रीटला सुव्यवस्थित फेरीवाल्यांच्या प्लाझामध्ये सुधारित करण्याची योजना आखत आहे. या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या ३८४ परवानाधारक फेरीवाल्यांना एकसारखे डिझाईन केलेले शॉप दिले जातील. जेणेकरून दुकानदारांसाठी फूटपाथवर चालण्यासाठी पुरेशी जागा निर्माण करता येईल. प्रशासकिय संस्था मध्यवर्ती भाग सुशोभित करून, स्ट्रीटच्या बाजूने चिन्हे आणि फॅन्सी पथदिवे लावण्याची योजना आखत आहे.

“फॅशन स्ट्रीटकडे जाणारे सर्व रस्ते आणि फूटपाथ सुशोभित आणि काँक्रिटीकरण केले आहेत याची आम्ही प्रथम खात्री करू. विक्रेत्याच्या जागेचे नियमन केल्याने, आम्ही पादचाऱ्यांसाठीही जागा मोकळी करू शकू,” असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

डिस्प्लेवरील पोशाखांचे वर्गीकरण केले जाईल, मुलांसाठी स्वतंत्र विभाग आणि पादत्राणांसाठी एक झोन असेल. एकदा त्याचा नवा अवतार उघड झाल्यानंतर पादचाऱ्यांना आणि दुकानदारांना आताच्याप्रमाणे जागेसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

पालिका विक्रेत्यांना ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी योग्य शिष्टाचाराचे प्रशिक्षण देखील देईल. आम्ही विक्रेत्यांशी सुरुवातीच्या बैठका घेतल्या आहेत, ”असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्या टप्प्यात, प्रशासकिय संस्था सर्वेक्षण करेल, त्यानंतर डिझाइन मॉडेल तयार करेल आणि नंतर ते अंतिम मंजुरीसाठी उच्च अधिकार्‍यांसमोर सादर करेल.

“फॅशन स्ट्रीटला परदेशातील पर्यटक आणि इतर दुकानदारांना आकर्षित करण्यासाठी सुधारणेची गरज आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास तीन महिने लागतील,” असं अधिकारी म्हणाले.

फॅशन स्ट्रीट येथील स्टॉल ओनर्स असोसिएशनचे सदस्य इब्राहिम मोहम्मद म्हणाले, “आम्ही पालिकेशी नूतनीकरणाबाबत चर्चा केली असली तरी, त्यांनी जागा एका संघटित बाजारपेठेत रूपांतरित केल्यास आम्ही त्यास प्राधान्य देऊ जेथे फुटपाथवर विक्री करणारे इतर परवानाधारक विक्रेतेही आहेत.”


हेही वाचा

आता 30 जून पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार

स्कूल बस असोसिएशन बस भाडे 15-20 टक्के वाढवणार

पुढील बातमी
इतर बातम्या