Advertisement

आता 30 जून पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार

या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे.

आता 30 जून पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार
SHARES

सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली आहे. आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचं आधार-पॅन अद्याप लिंक केलं नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे.

आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही.

  • आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही लिंक आधार पर्याय निवडा.
  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर आधार कार्डवर असलेलं नाव टाकावं लागेल.
  • वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर त्याखाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
  • यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
  • तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल.
  • तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा