मुंबई पालिकेच्या विशेष समित्यांचे दौरे रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( यांच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेच्या  (वैधानिक आणि विशेष समित्यांच्या दौरे ( रद्द  (cancelled) करण्यात आले आहेत. त्यामुळे समिती सदस्यांचा हिरमोड झाला आहे. पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये समिती सदस्यांचे अभ्यास दौरे होणार होते. 

मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या दौरे देशात तसंच परदेशात आयोजित करण्यात आले होते. यानुसार सुधार समितीचा दौरा बंगळूरु-म्हैसूर येथे होणार होता. तर शिक्षण समितीचा दौरा उत्तराखंड, महिला आणि बालकल्याण समितीचा दौरा केरळ, स्थापत्य समितीचा दौरा अंदमान-निकोबार, वृक्ष प्राधिकरण समितीचा दौरा सिंगापूर आणि आरोग्य समितीचा दौरा चीन येथे होणार होता. या दौऱ्यांना गटनेत्यांकडून मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे समिती सदस्यांनी स्वतःच्या खर्चाने दौरा करण्याची तयारी केली होती.

या दौऱ्यांना आदित्य ठाकरेंकडून (Aditya Thackeray)आधी परवानगी मिळाली होती. मात्र, चीन (मध्ये कोरोना विषाणू (चा संसर्ग सुरु झाल्याने चीनमधील दौरा रद्द करण्यात आला. तर दुसरीकडे पालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असताना अभ्यास दौऱ्यांवर अनाठायी खर्च नको अशी टीका होत होती. टीका झाल्याने आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर हे दौरे रद्द करण्यात आले. 


हेही वाचा -

मुंबईत Corona Virus चे ४ संशयित

अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञान


पुढील बातमी
इतर बातम्या