Advertisement

मुंबईत Corona virus चे ४ संशयित

काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून चीनमधून आलेल्या दोन जणांना मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) दाखल केले होते. पण आता संशयितांची संख्या वाढत आहे.

मुंबईत Corona virus चे ४ संशयित
SHARES

चीनमध्ये कोरोना विषाणू (Corona virus) पसरल्यामुळे आता मुंबई (mumbai) सह देशभरात सावधगिरी बाळगली जात आहे. चीन (china) मधून आलेल्या सर्व प्रवाशांची (airport) विमानतळावर तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून चीनमधून आलेल्या दोन जणांना मुंबई महापालिकेच्या  (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) दाखल केले होते. पण आता संशयितांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून मुंबईतील एका ३६ वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत सापडलेला हा चौथा रुग्ण आहे.

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे राहणाऱ्या या संशयित व्यक्तीला कस्तुरबा गांधी रुग्णालयात (Kasturba Hospital) डाॅक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कोरोना विषाणू (Corona virus) च्या संशयावरून तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी केल्यानंतर तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. चीनमधील वुहानमध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण सापडल्यानंतर २४ जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २७०० प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात अद्याप कोरोना विषाणू (Corona virus) ची कोणतीही घटना घडलेली नाही. संशयाच्या आधारे सावधगिरीचा उपाय म्हणून या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मुंबई महानगर पालिका (बीएमसी) (Mumbai Municipal Corporation) च्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) स्वतंत्र वॉर्ड यासाठी तयार केला आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका? 'अशी' घ्या खबरदारी

मुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित रुग्ण, कस्तुरबात उपचार सुरू




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा