Advertisement

मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका? 'अशी' घ्या खबरदारी

कोरोना विषाणू म्हणजे काय? हा कसा पसरतो आणि संक्रमण कसे होते? तसंच त्याची लक्षणं काय आहेत? हे जाणून घ्या. जर तुम्हाला लक्षणं माहिती असतील किंवा या आजाराबद्दल अधिक जागरूक असाल तर धोका टाळता येऊ शकतो.

मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका? 'अशी' घ्या खबरदारी
SHARES

चायना (China) मध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ८०० हून अधिक जण संक्रमित आहेत. कोरोना विषाणूची तीव्रता पाहता, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. असं असलं तरी कोरोनाचे रूग्ण अमेरिका त्यानंतर अनेक देशात आढळले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाचे संक्षयीत रुग्ण आढळले आहेत.

कोरोना (Coronavirus) विषाणू म्हणजे काय? हा कसा पसरतो आणि संक्रमण कसे होते? तसंच त्याची लक्षणं काय आहेत? हे जाणून घ्या. जर तुम्हाला लक्षणं माहिती असतील किंवा या आजाराबद्दल अधिक जागरूक असाल तर धोका टाळता येऊ शकतो.

कोरोना व्हायरस म्हणजे?

कोरोना प्रत्यक्षात विषाणूंचा एक मोठा समूह आहे जो प्राण्यांमध्ये सामान्यपणे आढळतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीएस)च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचला. कोरोनो व्हायरस हा सार्स विषाणूसारखा आहे. या संसर्गामुळे ताप, सर्दी, धाप लागणे, सर्दी होणे, घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे न्युमोनियादेखील होऊ शकतो.


याचा प्रसार कसा होतो?

१) कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्याशी संपर्क झाला, तर संक्रमणाचा धोका

२) एखाद्या संक्रमित व्यक्तीस स्पर्श करणे 

३) संक्रमित व्यक्तीच्या तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्श करणे


कोरोनाची लक्षणे

१) खोकला, शिंका किंवा हात थरथरणे ही आहेत साधारण लक्षणं

२) वाहणारे नाक, खोकला, घसा खवखवणे, अधूनमधून डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश आहे

३) दुर्बल प्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांसाठी घातक

४) वृद्ध आणि मुले याचा सहज बळी पडतात

५) न्यूमोनिया, फुप्फुसात सूज येणं, शिंका येणं, दमा होणं ही लक्षणेदेखील आहेत


यावर उपचार काय?

अद्याप यावर कोणताही उपचार नाही. कोरोना व्हायरसवर कोणतीही लस नाही. हे टाळण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे खबरदारी घेणे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितलं आहे, असं संयुक्त राष्ट्र संघटनेनेही ट्विट केलं आहे.

काय खबरदारी घ्याल?

१) साबण आणि पाणी किंवा अल्कोहोलनं हात स्वच्छ धुवा
२) खोकला किंवा शिंका येत असताना नाक आणि तोंडाला मास्क लावा
३) सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणं असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधण्याचं टाळा
४) मांस आणि अंडी चांगले शिजवा
५) जंगलात आणि शेतात राहणाऱ्या प्राण्यांशी असुरक्षित संपर्क साधू नका



हेही वाचा

मुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित रुग्ण, कस्तुरबात उपचार सुरू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा