मुंबईत कोरोना व्हायरसचे २ संशयित रुग्ण, कस्तुरबात उपचार सुरू

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचे २ संशयित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हे दोन्ही संशयित रुग्ण चीनमधून मुंबईत दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे.

SHARE

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचे (corona virus) २ संशयित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिकेच्या (bmc health department) आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हे दोन्ही संशयित रुग्ण चीनमधून (china) मुंबईत दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे. 

चीन मधून (china) मुंबईत आलेल्या या २ संशयित रुग्णांना खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना तात्काळ चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा (corona virus) उद्रेक झाल्यानंतर मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. इथंच या दोन्ही रुग्णांना डाॅक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा- १०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक

कोरोना व्हायरसची लागण (corona virus, symptoms) झालेल्या आणि संशयित रुग्णांना हाताळण्याची सूचना राज्य सरकारकडून कस्तुरबा रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. तसंच यासंबंधीच्या सूचना तंतोतंत पाळण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे चीनहून मुंबई विमानतळावर (mumbai airport) उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरलची काही लक्षणे आढळून आल्यास त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, दिल्ली विमानतळांसह देशातील ७ विमानतळांवर चीनहून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसची (corona virus) लागण झाल्याने आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून ८३० जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. चीनमधून थायलंड आणि दक्षिण कोरियातही हा व्हायरस पसरत आहे. अमेरिकेतही या व्हायरची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

हेही वाचा- २ महिन्यांनंतरही प्रिन्सच्या मृत्यू अहवालाची प्रतिक्षा

संबंधित विषय
ताज्या बातम्या