१०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक

आॅनलाइन (Online) जेवण ( meal ) मागवणं गिरगावातील (Girgaon) एका व्यापाऱ्याला चांगलंच भारी पडलं आहे. १०० रुपयांच्या जेवणासाठी या व्यापाऱ्याला तब्बल १ लाख रुपये मोजावे लागले.

१०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक
SHARES

आॅनलाइन (Online) जेवण ( meal ) मागवणं गिरगावातील (Girgaon) एका व्यापाऱ्याला चांगलंच भारी पडलं आहे. १०० रुपयांच्या जेवणासाठी या व्यापाऱ्याला तब्बल १ लाख रुपये मोजावे लागले. 

हाॅटेल (hotel) चा नंबर गुगल (google) वरून शोधून जेवणाची आॅर्डर देणं व्यापाऱ्याला महागात पडलं आहे. गिरगावात राहणाऱ्या या व्यापाऱ्याला रविवारी दुपारी काळबादेवीमधील श्री ठक्कर भोजनालयातून (Shri Thakkar Restaurant) जेवणाची थाळी मागवायची होती. मात्र, त्याच्याकडं या भोजनालयाचा फोन क्रमांक नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्याने गुगलवरून भोजनालयाचा नंबर शोधला. त्या नंबरवर फोन करून त्याने जेवणाची थाळी ऑर्डर केली. घरी ऑर्डर आल्यावर पैसे देतो असं या व्यापाऱ्यानं सांगितलं. मात्र, ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीनं कॅश ऑन डिलिवरी (Cash on Delivery) साठी नकार दिला. बऱ्यादचा आॅर्डर घेऊन आमची फसवणूक झाली आहे.  तुम्ही ऑर्डर दिली हे कशावरून समजायचं. त्यामुळे कॅश ऑन डिलिवरी करत नसल्याचं सांगून तुम्हाला एक लिंक देतो त्यावर तुम्ही रक्कम पाठवा असं व्यापाऱ्याला सांगण्यात आलं. पैसे पाठवल्यावर तुमची ऑर्डर कन्फर्म होईल, असंही समोरच्या व्यक्तीने सांगितलं.

फोन ठेवल्यानंतर व्यापाऱ्याने आलेल्या लिंकवर क्लिक केलं. नंतर व्यापाऱ्याने आपलं नेटबँकिंग सुरू करून आपला आययडी (ID) आणि पासवर्ड टाकला.गिरगावा मात्र ओटीपी (OTP)  येत नव्हता. त्यामुळे पैसे खात्यातून गेल्याचं समजत नव्हतं. म्हणून व्यापाऱ्यानं पुन्हा एकदा ऑर्डर घेणाऱ्याला फोन केला. त्यावेळी समोरच्या माणसानं सांगितलं मोबाइल रिस्टार्ट करा म्हणजे ओटीपी (OTP)  येईल. त्यानंतर व्यापाऱ्यानं मोबाईल रिस्टार्ट केला. मात्र, त्यावेळी आपल्या बँक खात्यातून पैसे गेल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आलं. १०० रुपयांच्या थाळीसाठी व्यापाऱ्याला तब्बल १ लाख रूपये गमवावे लागले आहेत. 

व्यापाऱ्यानं या प्रकरणी पोलिसांत (police) धाव घेत तक्रार दाखल केली. व्यापाऱ्याच्या मोबाईल (mobile) मधील एसएमएस (sms) आणि फोन यांच्या आधारावर पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.



हेही वाचा -

अॅपल कंपनीचे बनावट साहित्य विकणाऱ्या सात व्यापाऱ्यांना अटक

माटुंग्यात सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा