अॅपल कंपनीचे बनावट साहित्य विकणाऱ्या ७ व्यापाऱ्यांना अटक

व्यापाऱ्यांच्या दुकानातून ४१ लाखांचा अॅपल कंपनीच्या बनावट अॅसेसरींचा साठा जप्त

अॅपल कंपनीचे बनावट साहित्य विकणाऱ्या ७ व्यापाऱ्यांना अटक
SHARES

अॅपल कंपनी (apple mobile)च्या बनावट अॅसेसरीची बाजारत विक्री करून नागरिकांसह कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा (crime branch) ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात व्यापाऱ्यांना खारमधून अटक केली आहे. या व्यापाऱ्यांच्या दुकानातून ४१ लाखांचा अँपल कंपनीच्या बनावट अॅसेसरींचा साठा जप्त केला आहे.

हेही वाचाः-देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

खार (Khar )मध्ये काही व्यापारी अॅपल कंपनीच्या बनावट अॅसेसरींचा पुरवठाकरून नागरिकांसह कंपनीची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाला या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले होते.  त्यानुसार पोलिसांनी खार लिंकरोड(link road)वरील स्क्वेअर माँलमध्ये सापळारचून कारवाई केली.

हेही वाचाः-दोनशे रुपयांसाठी त्याने केली भावाची हत्या

पोलिसांनी माॅलमधील सात वेगवेगळ्या मोबाइल दुकानात छापा टाकला असता. पोलिसांना मोठ्या प्रमाणात अॅपल कंपनीच्या बनावट अॅसेसरीजचा साठा मिळाला.पोलिसांनी सात ही दुकानमालकांना ताब्यात घेतले. हितेश सुतार, कृष्णकुमार पुरोहित, नटपतराम देवाशी, उजेफ्रा अब्दुल कय्यूम सिप्रा, भावाराम देवाशी, गणपतसिंग राजपूत अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या व्यापाऱ्याच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल ४१ लाखांचा बनावट अॅसेसरीजचा साठा जप्त केला आहे. न्यायालयाने या सात ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

हेही वाचाः- आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा