Advertisement

देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

देवनार डम्पिंग ग्राउंड (Deonar dumping ground) वरील कचऱ्यापासून (Garbage) आता लवकरच वीजनिर्मिती (Electricity generation) करण्यात येणार आहे. तब्बल ६ वर्षांनंतर मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासाठी ठेकेदार (Contractor) सापडला आहे.

देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती
SHARES

 देवनार डम्पिंग ग्राउंड (Deonar dumping ground) वरील कचऱ्यापासून (Garbage) आता लवकरच वीजनिर्मिती (Electricity generation) करण्यात येणार आहे. तब्बल ६ वर्षांनंतर मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासाठी ठेकेदार (Contractor) सापडला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील ३ हजार मेट्रिक टन कच-यावर दररोज प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नव्हता. त्यामुळे पालिकेने निविदेमधील काही अटी शिथिल केल्या. त्यानंतर रोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन कंपन्यांनी अनुकुलता दर्शवली. पालिकेने यापैकी एका कंपनीची निवड केली आहे. स्थायी समितीच्या पटलावर याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

देवनार डम्पिंग ग्राउंड  (Deonar dumping ground) हे मुंबई (mumbai) तील सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे येथील कचऱ्यापासून  वीजनिर्मिती (Electricity generation) करण्यासाठी २०१४ मध्ये पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र यामध्ये जाचक अटी असल्याने ठेकेदार पुढे येत नव्हते. त्यामुळे पालिकेने २०१६ मध्ये अटी शिथिल करून पुन्हा निविदा मागवल्या. मात्र, रोज ३ हजार मेट्रिक टन कच-यावर (Garbage)  प्रक्रिया करण्याची क्षमता कोणत्याच कंपनीमध्ये नव्हती. त्यामुळे पालिकेने रोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यासाठी २०१८ मध्ये पुन्हा निविदा मागवल्या. याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला.  यापैकी एका कंपनीची निवड पालिकेने केली आहे.  या प्रकल्पासाठी महापालिका संबंधित ठेकेदाराला देवनारमधील बारा हेक्टर जागा देणार आहे.


देवनार डम्पिंग ग्राउंड (Deonar dumping ground) वर कचरा  (Garbage) टाकण्यास मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) १९२७ मध्ये  सुरुवात केली. या ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने हे डम्पिंग रोड बंद करण्यात येणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यास तयार असलेल्या कंपनीला १२ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील ४० महिन्यांमध्ये ठेकेदार कंपनीला आपला प्रकल्प उभारावा लागणार आहे. ठेकेदार (Contractor) कंपनीला १५ वर्षे हा प्रकल्प चालवावा लागणार आहे. त्यातून दरवर्षी १७ दशलक्ष ऊर्जानिर्मिती (Power generation) करणं बंधनकारक आहे. 


  • देवनार डम्पिंग ग्राउंड (Deonar dumping ground) वरील कचऱ्यापासून (Garbage) आता लवकरच वीजनिर्मिती (Electricity generation) करण्यात येणार आहे.
  • ६ वर्षांनंतर मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासाठी ठेकेदार (Contractor) सापडला आहे. 
  • रोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन कंपन्यांनी अनुकुलता दर्शवली. हेही वाचा -

'या' टिसी'ने रेल्वेला कमावून दिले कोट्यावधी रुपये

चेंबुरमध्ये बेस्ट बसची तोडफोड, वंचितच्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण
संबंधित विषय