Advertisement

चेंबुरमध्ये बेस्ट बसची तोडफोड, वंचितच्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण

चेंबुरमध्ये बेस्टची थांबवून त्या बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये विलास बाबासाहेब दाभाडे (५३) हे बसचालक जखमी झाले आहेत.

चेंबुरमध्ये बेस्ट बसची तोडफोड, वंचितच्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण
SHARES

नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बंदचं आवाहन केलं होतं. मात्र, या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) आता हिंसक वळण (Violent) लागलेलं आहे. चेंबुरमध्ये (Chembur) बेस्टची थांबवून त्या बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये विलास बाबासाहेब दाभाडे (५३) हे बसचालक जखमी झाले आहेत.

बेस्ट बस (Best Bus) मार्ग ३६२ या बसच्या काचा तोडण्यात आल्या आहेत. याबाबच 'बसगाडी बसमार्ग क्र. ३६२ वर चालत असताना स्वस्तिक पार्क (Swastik Park) इथं ०९.१५ वाजता बसच्या पुढील काचेवर दगड मारण्यात आला. त्यामुळं बसची चालकासमोरील मोठी काच फुटली. बसचालक यांच्या दोन्ही हाताना काचेचे तुकडे लागून जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आलं' अशी माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

या प्रकरणी बेस्ट बसच्या काचा वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच, 'महाराष्ट्र बंदला सकाळपासून सुरूवात झाली आता १० वाजून गेले आम्हाला दगड फेक करायाची असती तर ती कधीच केली असती. हे हिंसक वळन इतर संघटनांनी केलं आहे. त्यामुळं हे कृत्य ज्या संघटनानं केलं त्यांना पोलिसांनी समोर आणवं', असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

ठाण्यातील (Thana) तीन-हात नाका चौकात (Teen Hath Naka Chowk) वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन (Protest) करण्यात येत आहे. रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. तसंच, सायन-ट्रॉम्बे इथंही रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) राज्यातील तब्बल २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसंच, सरकारी वा खासगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन बैठकीत करण्यात आलं होतं. मात्र, तरीही आंदोलना दरम्यान हिंसक वळन लागलं आहे.हेही वाचा -

NRC, CAA विरोधात 'वंचित'चा महाराष्ट्र बंद

मुंबईत पुन्हा झाडांची होणार कत्तलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा