Advertisement

मुंबईत पुन्हा झाडांची होणार कत्तल

इमारतींच्या पुनर्विकासासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी ६६ झाडांची कत्तल (Tree Cuting) करण्यात येणार आहे.

मुंबईत पुन्हा झाडांची होणार कत्तल
SHARES

मुंबईतील घाटकोपर (Ghatkoper) पंतनगर (Pantnagar) येथील इमारतींचं पुनर्विकास (Building Repairing) करण्यात येणार आहे. तसंच, परळ (Parel) येथील राजकमल स्टुडिओ (Raj kamal Studio) मार्गावरील रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. परंतु, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी ६६ झाडांची कत्तल (Tree Cuting) करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या (Tree Authority Committee) बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

झाडांच्या होणाऱ्या या कत्तलीला शिवसेना (Shiv sena) विरोध करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या प्रकरणी शिवसेनेनं कोणतीही भूमिका न घेतल्यानं झाडांच्या कत्तलीचा (Tree Cuting) मार्ग मोकळा झाला आहे. परळ येथील डॉ. एस. एस. राव व राजकमल स्टुडिओ मार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाबाहेरील (Mahatma Gandhi Hospital) रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे. रुंदीकरणाआड १८ झाडे अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळं यामधील १३ झाडं कापली जाणार आहे. त्याचप्रमाणं, ५ झाडांचं पुनर्रोपण (Re-planting of trees) केलं जाणार आहे.

हेही वाचा - शुक्रावारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर दुरूस्तीची कामं

पंतनगर घाटकोपर पूर्व इथं १४ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येतो आहे. या इमारतीच्या बांधकामाआड (Building Repairing) ४८ झाडे येत आहेत. त्यामुळं यापैकी १८ झाडं कापली जाणार आहेत. त्याशिवाय, ३० झाडांचं पुनर्रोपण (Re-planting of trees) करण्यात येणार आहे. पुनर्रोपण केलेल्या झाडांपैकी किती जगली, किती झाडं मृत झाली याचा कोणताही हिशेब महापालिका (BMC) देत नसल्यानं सर्व ६६ झाडांची एकप्रकारे कत्तलच होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - महिलांना रेल्वे जवान सोडणार घरापर्यंत

याआधी मुंबईतील मेट्रो-३ (Metro-3) प्रकल्पाच्या कारशेडचं (Carshade) गोरेगावातील (Goregaon) आरे कॉलनमध्ये (Aarey Colony) बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र या बांधकामा येथील हजोरो झाडांची कत्तल (Tree Cuting) करण्यात आली. त्यामुळं मुंबईतील पर्यावरणप्रेमींसह अनेक संघटना, राजकीय पक्ष व मुंबईकरांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी अनेकांना पोलिसांनी (Police) अटक केली होती.



हेही वाचा -

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार

पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा