'या' टिसी'ने रेल्वेला कमावून दिले कोट्यावधी रुपये

बेशिस्त प्रवाशांना कायमची अद्दल घडवण्यासाठी रेल्वेची विशेष मोहिम

'या' टिसी'ने रेल्वेला कमावून दिले कोट्यावधी रुपये
SHARES

तेव्हा विनातिकीट रेल्वे (Rail way) प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता वेळीच सावध व्हावे, उपनगरीय रेल्वे तून फिरताना या तिकिट तपासणी (Tikit Collector)सांची गाट पडल्यास तुम्हचे काही खरे नाही. रेल्वेने सादर केलेल्या एका अहवालात बेशिस्त प्रवाशांना कायमची अद्दल घडवण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत या चार तिकिट तपासणीसांनी सर्वाधिक दंड आकारून महसूल गोळा करून दिला आहे. त्यामुळे फूकट्या प्रवाशांनी आता वेळीच सावध व्हावे आणि तिकीट काढून प्रवास करावा.. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल.

हेही वाचाः- चेंबुरमध्ये बेस्ट बसची तोडफोड, वंचितच्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण

 रवी कुमार हे फुकट्या प्रवाशांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध आहेत. तिकीट तपासनीस रवी कुमार यांनी २०१९ या वर्षात १ कोटी ४५ लाखांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला. रेल्वेतर्फे सर्वात जास्त दंड वसूल करणाऱ्या तिकीट तपासनीस यांची नावे जाहीर करण्यात आली. त्या चार तिकीट तपासनीसांनी २०१९ मध्ये १ कोटींच्यावर दंड वसूल केला आहे. मुंबई(Mumbai)त मध्य रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र असे काही प्रवासी आहेत, जे विनातिकीट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांना पकडण्याचे काम तिकीट तपासनीस करतात. यामध्ये एस. गलांडे यांचे नाव सर्वात पुढे आहे.

हेही वाचाः- तेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा

गलांडे यांनी १ कोटी ५१ लाख रुपयांचा दंड २०१९ मध्ये वसूल केला आहे. त्यानंतर रवी कुमार यांनी १ कोटी ४५ लाख , एम एम शिंदे १ कोटी ७ लाख, डी कुमार १ कोटी २ लाख असा दंड वसूल केला आहे. रवी कुमार यांनी आतापर्यत २०,६५७ फुकट्या प्रवाशांना पकडले आहे. तिकीट तपासनीस रवी कुमार यांच्यानी आपल्या या चांगल्या कामगिरीचे श्रेय वरिष्ठांना आणि त्यांच्या पत्नीला दिले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा